Wednesday, March 30, 2016

अमिताभ आणि मी


रविवारी सकाळी ७ वाजता झोपले होते तोच भ्रमणध्वनी वाजला इतक्या पहाटे ब्राह्ममुहूर्तावर माझी झोपमोड म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखेच.....असो कुणाचा होता पहिला तर private number ...आणि फोन भारतातून कुणाचा तर अमित आजोबांचा (अमित आजोबा म्हणजेच आपले अमिताभ बच्चन ...त्यात काय खास नेहमीच येतो मला ....!!!! ) बोलूया म्हणून घेतला तर पलीकडून आवाज आला रागावू नको ग बाई माहित आहे मला तुझी झोपमोड झालेली चालत नाही मला पण काय करू हे अमेरिकेच टायमिंग लक्षातच येत नाही मुळी...आता आजोबाच इतके समजावत आहेत म्हणल्यावर मी पण पाघळले ...त्यांना म्हणल " बडे बडे देशो में छोटी छोटी बाते होती हैं "....तर ते शांतच एकदम डोक्यात प्रकाश पडला अरे देवा हे तर वाक्य शाहरुखच..हळू आवाजात विचारले फोन का केला ? 

अमित आजोबा : अग पुढच्या रविवारी वाढदिवस आहे माझा...
मी : आहे हो लक्षात !! पाठवली आहे तुमची भेटवस्तू यासाठी केली का झोपमोड ? अमित आजोबा :नाही ग तसे नाही गेल्या वर्षी तू अमेरिकेला जात होती आपली धावतीच भेट झाली परत तू सेट होण्यात व्यस्त झालीस भेटच नाही आपली .....तर काय ये तू वाढदिवसाला !!! मी : आजोबा यायला काही हरकत नाही हो ..पण १८ तास प्रवास परत तो jetlag अमित आजोबा : पूर्ण ऐकून तर घे new york ला ये म्हणत आहे इकडे नाही (ऐकूनच उडाले मी ) मी: इथे आला मला नाही कळवलं ते आजोबा : अग बयो उद्या निघणार आहे ग त्या आधीच कळवले ना तुला !! मी : असे होय सांगते नवऱ्याला विचारून हो म्हणाला तर येते नक्की ( पलीकडून अस्पष्टसा आवाज विचारून ??? तो काय नाही म्हणतोय त्याला धमकी देऊन येशील तू !!!) मी: काही म्हणलात का ? आजोबा : छे काहीच नाही ...हो बघ हो सांगून.... मी : बर .....ठेवू का आता नवऱ्याचा चहा करून कधीच झाला बोलावत आहे मला !! आजोबा मनातल्या मनात पाहिलत नवरा हिच्या मुठीत ...!!
चहा पीत पीत म्हणल अहो new york ला जाणार आहे रविवारी तुमचे काय ते सांगा ... आजोबाना फोन लावला मी : हो येतेय मी पण जया आजी आणि ऐश्वर्या काकूचे काय त्या दोघी येणार आहेत कि नाहीत ?
आजोबा : आजीचे सांधे हल्ली साथ नाही देत तिला ....आणि काकूचे शूटिंग आहे म्हणे ..... मनात मी बरे झाले सुंठेवाचून खोकला गेला ...
शनिवारी झोपताना सांगितले उद्या लवकर उठवा मला जायचे आहे ना new york ला ..........तरी ९ वाजलेच उठायला किती लवकर उठायचे ते ? आवरून बाहेर आले तर विमान नाही हेलिकॉप्टर ते पण चालू होईना ...फोन वर फोन येत होते कुठे आहे ते विचारायला कसे तरी पोहचले तिथे जाऊन... !! तर बाहेर स्वागतला मिशेल काकू मला घेऊनच आत गेल्या संस्कारी माणसे हो अमेरिकेतील ..आत जाता जाता बरेचजण भेटले ..अमित आजोबाना नमस्कार केला आणि शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या किती खुश झाले म्हणून सांगू ....अगदी भरून आले होते त्यांना ...तितक्यात बराक ओबामा काका आले माझ्याकडे बघून म्हणाले खूपच उशीर केला यायला ? मी एक तिरका कटाक्ष टाकला आणि म्हणाले विमान पाठवणार होता मग ते हेलिकॉप्टर कसे ?? तर कसल्या शिताफीने विषय बदलला आणि

आजोबाना म्हणाले चला केक कापू आता ...मी शांतच ते पाहून आजोबांनी सांगितल केक मध्ये अंडे नाहीय ...आणि जेवण पण शुद्ध शाकाहारी आहे पुरणपोळी , उकडीचे मोदक .......... आणि हो ड्रिंक्स ओह सॉरी अग म्हणजे लिंबू सरबत आणि शहाळे ठेवले आहे .... हे ऐकून में जाम खुश झाले ...
चला म्हणून जर पुढे गेले तर मागून हाक श .. श .. श ...श्वेता बघितल वळून तर शाहरुख त्याला म्हणला बाबारे वय वाढले तुझे पण तोतरे पण काही कमी झाला ....त्याच्याशी थोडे ब्रुकलीन पुला विषयी बोलले त्याला तो कल हो ना हो २ साठी हवा आहे म्हणे .....
सगळ्यांशी बोलून थंड बसले होते तर तेवढ्यात समोर जाक्सनानांचा मायकल त्याला बघून बोबडीच वळली माझी हा आता ? इथे ? कसे ?न काय ?..त्याला म्हणल उगाच ए ई ओ करून मला भीती नाही दाखावायची तेवढ्यात आले लक्षात अरे हो आता पितृ पक्ष चालू आहे ना मग बरोबर ...घे म्हणले त्यालाही वाहत्या गंगेत हात धुवून ...तुझे दिवस चालू आहेत !!! 
तेवढ्यात आजोबा आणि ओबामा काका धावत जवळ आले आणि म्हणले जावईबापूंचा(माझ्या नवऱ्याचा ) फोन आला होता तिथे बोस्टोनला म्हणे मार्क झुकेर्बार्ग ने काही तरी घोळ घातला आहे ...अरे देवा एक दिवस कुठे बाहेर गेले कि सगळे अशी काम चुकारी करतात किती त्रास असतो मला ....ह्म्म्म आजोबाना म्हणले आता निघते लवकरात लवकर पोहचायला हवे मला तर ओबामा काका बोलले चाल १० मिनिटात सोडतो तुला तिथे ....
खरे बोस्टोन ला सोडणार कि आणि कुठे ? चल ग सोडतो म्हणून हात धरून बसवले विमानात आणि खरेच हो १० मिनिटाला मी माझ्या गादीवर झोपलेली होते .....


(अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसा दिवशी न्यूयॉर्क मध्ये wax museum ला गेले होते त्यावेळी सुचलेला हा कल्पना विलास……। )

3 comments: