Wednesday, March 30, 2016

अमिताभ आणि मी


रविवारी सकाळी ७ वाजता झोपले होते तोच भ्रमणध्वनी वाजला इतक्या पहाटे ब्राह्ममुहूर्तावर माझी झोपमोड म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखेच.....असो कुणाचा होता पहिला तर private number ...आणि फोन भारतातून कुणाचा तर अमित आजोबांचा (अमित आजोबा म्हणजेच आपले अमिताभ बच्चन ...त्यात काय खास नेहमीच येतो मला ....!!!! ) बोलूया म्हणून घेतला तर पलीकडून आवाज आला रागावू नको ग बाई माहित आहे मला तुझी झोपमोड झालेली चालत नाही मला पण काय करू हे अमेरिकेच टायमिंग लक्षातच येत नाही मुळी...आता आजोबाच इतके समजावत आहेत म्हणल्यावर मी पण पाघळले ...त्यांना म्हणल " बडे बडे देशो में छोटी छोटी बाते होती हैं "....तर ते शांतच एकदम डोक्यात प्रकाश पडला अरे देवा हे तर वाक्य शाहरुखच..हळू आवाजात विचारले फोन का केला ? 

अमित आजोबा : अग पुढच्या रविवारी वाढदिवस आहे माझा...
मी : आहे हो लक्षात !! पाठवली आहे तुमची भेटवस्तू यासाठी केली का झोपमोड ? अमित आजोबा :नाही ग तसे नाही गेल्या वर्षी तू अमेरिकेला जात होती आपली धावतीच भेट झाली परत तू सेट होण्यात व्यस्त झालीस भेटच नाही आपली .....तर काय ये तू वाढदिवसाला !!! मी : आजोबा यायला काही हरकत नाही हो ..पण १८ तास प्रवास परत तो jetlag अमित आजोबा : पूर्ण ऐकून तर घे new york ला ये म्हणत आहे इकडे नाही (ऐकूनच उडाले मी ) मी: इथे आला मला नाही कळवलं ते आजोबा : अग बयो उद्या निघणार आहे ग त्या आधीच कळवले ना तुला !! मी : असे होय सांगते नवऱ्याला विचारून हो म्हणाला तर येते नक्की ( पलीकडून अस्पष्टसा आवाज विचारून ??? तो काय नाही म्हणतोय त्याला धमकी देऊन येशील तू !!!) मी: काही म्हणलात का ? आजोबा : छे काहीच नाही ...हो बघ हो सांगून.... मी : बर .....ठेवू का आता नवऱ्याचा चहा करून कधीच झाला बोलावत आहे मला !! आजोबा मनातल्या मनात पाहिलत नवरा हिच्या मुठीत ...!!
चहा पीत पीत म्हणल अहो new york ला जाणार आहे रविवारी तुमचे काय ते सांगा ... आजोबाना फोन लावला मी : हो येतेय मी पण जया आजी आणि ऐश्वर्या काकूचे काय त्या दोघी येणार आहेत कि नाहीत ?
आजोबा : आजीचे सांधे हल्ली साथ नाही देत तिला ....आणि काकूचे शूटिंग आहे म्हणे ..... मनात मी बरे झाले सुंठेवाचून खोकला गेला ...
शनिवारी झोपताना सांगितले उद्या लवकर उठवा मला जायचे आहे ना new york ला ..........तरी ९ वाजलेच उठायला किती लवकर उठायचे ते ? आवरून बाहेर आले तर विमान नाही हेलिकॉप्टर ते पण चालू होईना ...फोन वर फोन येत होते कुठे आहे ते विचारायला कसे तरी पोहचले तिथे जाऊन... !! तर बाहेर स्वागतला मिशेल काकू मला घेऊनच आत गेल्या संस्कारी माणसे हो अमेरिकेतील ..आत जाता जाता बरेचजण भेटले ..अमित आजोबाना नमस्कार केला आणि शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या किती खुश झाले म्हणून सांगू ....अगदी भरून आले होते त्यांना ...तितक्यात बराक ओबामा काका आले माझ्याकडे बघून म्हणाले खूपच उशीर केला यायला ? मी एक तिरका कटाक्ष टाकला आणि म्हणाले विमान पाठवणार होता मग ते हेलिकॉप्टर कसे ?? तर कसल्या शिताफीने विषय बदलला आणि

आजोबाना म्हणाले चला केक कापू आता ...मी शांतच ते पाहून आजोबांनी सांगितल केक मध्ये अंडे नाहीय ...आणि जेवण पण शुद्ध शाकाहारी आहे पुरणपोळी , उकडीचे मोदक .......... आणि हो ड्रिंक्स ओह सॉरी अग म्हणजे लिंबू सरबत आणि शहाळे ठेवले आहे .... हे ऐकून में जाम खुश झाले ...
चला म्हणून जर पुढे गेले तर मागून हाक श .. श .. श ...श्वेता बघितल वळून तर शाहरुख त्याला म्हणला बाबारे वय वाढले तुझे पण तोतरे पण काही कमी झाला ....त्याच्याशी थोडे ब्रुकलीन पुला विषयी बोलले त्याला तो कल हो ना हो २ साठी हवा आहे म्हणे .....
सगळ्यांशी बोलून थंड बसले होते तर तेवढ्यात समोर जाक्सनानांचा मायकल त्याला बघून बोबडीच वळली माझी हा आता ? इथे ? कसे ?न काय ?..त्याला म्हणल उगाच ए ई ओ करून मला भीती नाही दाखावायची तेवढ्यात आले लक्षात अरे हो आता पितृ पक्ष चालू आहे ना मग बरोबर ...घे म्हणले त्यालाही वाहत्या गंगेत हात धुवून ...तुझे दिवस चालू आहेत !!! 
तेवढ्यात आजोबा आणि ओबामा काका धावत जवळ आले आणि म्हणले जावईबापूंचा(माझ्या नवऱ्याचा ) फोन आला होता तिथे बोस्टोनला म्हणे मार्क झुकेर्बार्ग ने काही तरी घोळ घातला आहे ...अरे देवा एक दिवस कुठे बाहेर गेले कि सगळे अशी काम चुकारी करतात किती त्रास असतो मला ....ह्म्म्म आजोबाना म्हणले आता निघते लवकरात लवकर पोहचायला हवे मला तर ओबामा काका बोलले चाल १० मिनिटात सोडतो तुला तिथे ....
खरे बोस्टोन ला सोडणार कि आणि कुठे ? चल ग सोडतो म्हणून हात धरून बसवले विमानात आणि खरेच हो १० मिनिटाला मी माझ्या गादीवर झोपलेली होते .....


(अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसा दिवशी न्यूयॉर्क मध्ये wax museum ला गेले होते त्यावेळी सुचलेला हा कल्पना विलास……। )

Wednesday, March 23, 2016

चिमण्या


संध्याकाळचे ५ वाजत आले कि माझी रणभूमी वर जाण्याची तयारी सुरु  असे कारण आमची तीन पात्र ….  आई भूक लागली करतच घरी !!  शाळेचे दप्तर एकीकडे तर ड्रेस दुसरीकडे आणि जयघोष काय केले ते सांग … भडंग ,चकली, लाडू चिवडा ,पोहे  रोज कितीही वेगळे सांगा पण यावर मात्र यांचे एकमत रोज काय ग तेच तेच 
" काहीतरी वेगळे " करत जा ना . एकीला बोर्नविटाची कोल्डकॉफी , एकीचे गरम दुध , एकाला चहा  खाणे पिणे कमी पण नाटकेच जास्त . 
 अभ्यासाचे तर  नाव नको … हि दोन नंबरची तर मराठी महिने  म्हण म्हणताना माघ नंतर पुढे , अग माघ नंतर फाल्गुन ग पण नाही म्हणे आई अग माघ नंतर पुढेच असते फाल्गुन काय ?  मलाच वेड्यात काढून मोकळी  फक्त डोके फोडायचे बाकी होते यांच्यासमोर . यांचे लहानपण खूप  भुर्रकन गेले . मोठीची बारावी झाली त्यांनतर एकेक करत शिक्षणासाठी म्हणून बाहेर पडली हि पाखरे . मुलांसोबत घराला पण एक पोक्तपण आले तेही आता शांत  शांत राहू लागले . घरातला चिवचिवाट आता महिन्यातून एकदा दोनदाच होऊ लागला . 

मोठ्या चिमणीचे लग्न ठरले ती उडाली तेव्हा धाकटी होती म्हणून थोडे कमी जाणवले दोन वर्षांनी तीही उडाली मग मात्र घर खायला उठले …  लहानपणी खेळायला पळताना शाळेला जाताना  अग बायानो दार  लावत जा ग प्रत्येक वेळी ओरडून सांगावे लागायचे   आणि आज तेच दार  मला रोज हसून विचारते , " आता कारण शोधते का मला उघडे ठेवण्यासाठी ?" रविवारी डोसे करायचे म्हणजे पहिला नंबर कुणाचा ? याची तयारी सकाळी कोण लवकर उठेल तो इथून तयारी … आणि आता ???     " काहीतरी वेगळे " याची कृती अजूनही सापडलीच नाहीय …  काहीतरी हरवत  आणि काहीतरी गवसत आणि ते नेमके काय असते हेच नाही उमजत !!!
  बाहेरून आल्यावर  घरातल्या पसाऱ्यासोबत मिळणाऱ्या गरम चहाची चवच जास्त गोड लागायची… आज या दोन चिमण्या खूप सुखात आहेत पण या मायेच्या घरट्याला त्यांची उणीव नेहमीच जाणवणार

(    माझ्या आईच्या मनातील भावनांना शब्दात गुंफायचा एक छोटासा प्रयत्न )    चिमण्या 

Friday, March 18, 2016

नाते

नाती अक्षरे दोनच पण साथ आयुष्यभराची जेव्हा जन्माला येतो तेव्हा रक्ताची नाती सोबत घेऊनच येतो... सख्खी ,चुलत ,मावस अशी बरीच ...पण जसे कळू लागते तसा नवा प्रकार तयार होतो जोडलेली नाती म्हणून ... 
रक्ताच्या नात्यात मान-पान ,ईर्ष्या असते ..लहानपणी भातुकलीचा डाव खेळताना मुद्दाम केली जाणारी भांडणे मोठेपणी खरी कधी होतात कळत देखील नाही ..लहानपणी जीवाला जीव देणारे मोठेपणी का उठतात एकमेकांच्या जीवावर ?मग इतके दिवस का जपले ते नाते जगाला देखाव दाखवण्यासाठीच का ? तेव्हा होणर्या एकमेकांच्या चुका सुधारून नात्यांमध्ये का नाही आणत सुंदरता? no one is perfect ...
जोडलेल्या नात्यांमध्ये आले तर दुख येते ते फक्त अपेक्षाभंगाचे कि एक तर आपण त्याच्या अपेक्षेला खरे उतरत नाही किंवा तो ...जर नात्यामध्ये भिंत न बांधता पूल बांधला तर दोन्हीला लागणारे समान एकच फक्त अर्थ वेगळा .....नाती रक्ताची असो व जोडलेली ती वाईट कधीच नसतात आपण कसे वागतो आपण काय बोलतो यावर त्याचं फुलन टिकून असते ..... महिनाभर न बोलून हि जपता येतात पण ती तितकीच खोल हि असवी लागतात सगळच बोलून सांगता येत नाही काही समजावून देखील घ्यावं लागत .. नाती हि झाडाच्या पानासारखी असतात एकदा तुटली कि जोडता येत नाहीत अन हिरवीहि राहत नाहीत ......

Wednesday, March 16, 2016

जास्वंदी

     

           आमचे घर बांधल्यावर  त्याच्या अंगणात  मी आणि माझ्या बहिणीने खूप झाडे लावली गुलाब ,मोगरा, आबोली अगदी लाजाळूसुद्धा पण  त्यानंतर १-२ वर्षांनी आईने कुठून तरी एका झाडाची फांदी आणून लावली आणि बोलली हे झाड वाढले कि देवाला खूप फुले होतील … … मी तर फार खुश  रोज सकाळी उठून देवासाठी फुले आणयाचे  माझ्या  फार आवडीचे काम .  मी रोज त्या झाडाला पाणी घालून कधी तुला कळी येणार  ? म्हणून त्यालाच विचारायचे .   तेव्हा ७-८ वर्षाची असेन आता इतके नाही आठवत पण त्या झाडाला हे रोज विचारायचा एक छंदच झाला होता … … 
  बहुदा त्या झाडाला माझी दया आली असेल पण थोडेच दिवसात त्याच्यावर मला एक कळी दिसली  आणि माझा तो आनंद अवर्णनीय  …… .!!!!  सकाळी अर्धवट उमलेले ते लाल जास्वंदीचे फुल बाप्पाच्या  डोक्यावर अगदी थाटात विराजमान झाले लाल फुलात बाप्पाचा थाट जास्त कि बाप्पामुळे फुलाचा जास्त ?? पण त्या दिवसापासून जास्वंदीने माझ्या मनावर राज्य केले .
                              घरी मी कधी एकटी किंवा मला एक एकटे वाटत  असताना खिडकीतून तिच्या डोलणाऱ्या फांद्या पाहून असे वाटायचे कि जणू त्या मला म्हणत आहेत कि आम्ही आहोत न गप्पा मारायला तुझ्या सोबत …!! खरेच या छोट्याश्या बागेत मी कितीही वेळ रमु  शकते आणि त्यांच्याशी गप्पा मारू शकते . घरातल्या प्रिय जागा पैकी हि एक जागा अत्यंत प्रिय मला .

माझी आई तर संध्याकाळचे ५ वाजले कि पायरीवर येउन बसते . शाळा सुटली कि येताजाता मुले  ,कळ्या तोडत जातात म्हणून कधी कधी तर यात मोठ्या बायका सुद्धा असतात!! गणपतीच्या दिवसात तर खूप लक्ष ठेवावे लागते नाहीतर आदल्या रात्री सगळ्या कळ्या गायब होतात . आमच्या घरी कळ्या तोडलेल्या कुणालाही नाही आवडत आई म्हणते दोन फुले कमी मिळाली तरी चालतील आपल्याला पण वेळे आधी फुल  तोडायचे नाही    झाडावर उमललेल्या कळीचा साज काही निराळाच असतो .

आम्हाला सकाळीही खूप लवकर उठून फुले काढावी लागतात नाहीतर सूर्योदयानंतर तिथे एकही आशेचा किरण नसतो . आता आमची जास्वंदी जवळ जवळ १८-१९ वर्षाची झाली आहे . तसा दुष्काळी  भाग असल्यामुळे पाणी कमीच… उन्हाळ्यात तर प्यायाच्या पाण्याचे हाल अशावेळी खूप दुरून पाणी आणून जगवली झाडे . आमची हि तळमळ  कदाचित जास्वंदीलाहि समजत असावी म्हणूनच तिने नेहमी भरभरून फुले दिली.
    आता परत थोडा बहर कमी आला असेल आईला विचारायला हवे ! मी आईशी फोन वर बोलत असताना माझ्या या सगळ्या झाडांचीही चौकशी करत असते ……. शेवटी लहानपणापासून जुळलेली नाळ आहे  ती

 कुंदा , गुलाब , आबोली , प्राजक्त आणि शेवंती सगळीच आहेत सोबतीला पण माझी हि जास्वंदी मात्र बारा महिने खुलते ,फुलते  स्वतः हसते आणि मलाही हसवते … !!! त्यामुळेच जेव्हा ब्लोग लिहियाचा ठरवले तेव्हा पहिले नाव डोळ्यसमोर जास्वंदीचेच आले …

आता गुलाबी ,पांढरी ,पिवळी जास्वंदीची झाडे आहेत पण माझ्या मनात घर करून राहिलेली माझी लाल जास्वंदी  !!!

Thursday, March 10, 2016

माझी प्रेरणा

खरे तर हा दिवस मझ्यासाठी रोजच असतो...मुळात मझी ओळखच अशी आहे कि "बापाची लाडकी लेक ".... मी खरेच खूप नशीबवान आहे कि असे बाबा मला मिळाले ...खूप शांत, मितभाषी ..माझा भाऊ तर त्यांना म्हणतो कि तुम्ही काय दिवसभरात इतकेच शब्द बोलयचे असा कोटा ठेवलाय का ?? इतके कमी बोलता ते .......त्यांना वाचनाची खूप आवड आहे... त्यांच्या मुळेच कि काय हा गुण मझ्यात पण आलाय .....आजपर्यंत कधीही ते आम्हला कोणत्या गोष्टीसाठी नाही बोलले नाहीत ..तुम्हला आवडतंय न करा मग .. मी आहे पाठीशी ....... हेच वाक्य कायम तोंडी ...
मी खूप हट्टी आहे पण माझे सगळे हट्ट पुरवलेत मझ्या बाबांनी .....मला अजून आठवतय अगदी ७-८ वर्षाची होते मी दिदीचा bday होता ...तिला आणि मला नवीन फ्रोक आणला होता ..पण मला तिचा होता तसलच हवा होता ...मझा दंगा सुरु आईकडून प्रसाद मिळाला लोकांसमोर..... पण बाबांनी तसच फ्रोक जाऊन आणला आणि मगच वाढदिवस केला ...... असे माझे बाबा मला जपणारे ...

मी खूप बडबडी ..कधी शांत दिसले कि त्यांना करमायचं नाही .....मला डॉक्टरकडे घेऊन जाने म्हणजे एक दिव्य असयाचे आई म्हण्याची तुमची लेक जाने आणि तुम्ही जाने तुम्हीच लाडावून ठेवली आहे तिला ....... ..आई ही घराला घरपण देते ...आपल्या पिलांना पदराखाली घेते ...बाबा त्या पिलांना चारा-पाणी घालतो ....त्याचं आजारपण कुणाला सांगत नाही कि आपली दुखणी कधी कोणाजवळ बोलत नाही ........ आईसोबत होते माझ हलके फुलके भांडण ...पण बाबांसोबत कधीच नाही झाले ...खरच बापच न लेकीच नाते निराळेच असते ....न मागता बाबाला कळत कि लेकीला काय हवाय न लेकीला कळत कि बाबाला काय पाहिजे ते .....लेकीच्या लग्नात डोळ्यातून न पाणी काढता कसे रडायचं हे मला माझ्या बाबांनी शिकवलं .....मी अमेरिकेला येताना डोळ्यातल पाण्याला कस थोपवल बाबांनी.... खरच तुम्ही great आहात बाबा ....देवाला एकच मागितल होत कि माझ्या बाबांसारखा नवरा दे........देव म्हणला वेडी आहेस का जगात बाबांसारखा फक्त बाबाच असतो.....