Wednesday, March 16, 2016

जास्वंदी

     

           आमचे घर बांधल्यावर  त्याच्या अंगणात  मी आणि माझ्या बहिणीने खूप झाडे लावली गुलाब ,मोगरा, आबोली अगदी लाजाळूसुद्धा पण  त्यानंतर १-२ वर्षांनी आईने कुठून तरी एका झाडाची फांदी आणून लावली आणि बोलली हे झाड वाढले कि देवाला खूप फुले होतील … … मी तर फार खुश  रोज सकाळी उठून देवासाठी फुले आणयाचे  माझ्या  फार आवडीचे काम .  मी रोज त्या झाडाला पाणी घालून कधी तुला कळी येणार  ? म्हणून त्यालाच विचारायचे .   तेव्हा ७-८ वर्षाची असेन आता इतके नाही आठवत पण त्या झाडाला हे रोज विचारायचा एक छंदच झाला होता … … 
  बहुदा त्या झाडाला माझी दया आली असेल पण थोडेच दिवसात त्याच्यावर मला एक कळी दिसली  आणि माझा तो आनंद अवर्णनीय  …… .!!!!  सकाळी अर्धवट उमलेले ते लाल जास्वंदीचे फुल बाप्पाच्या  डोक्यावर अगदी थाटात विराजमान झाले लाल फुलात बाप्पाचा थाट जास्त कि बाप्पामुळे फुलाचा जास्त ?? पण त्या दिवसापासून जास्वंदीने माझ्या मनावर राज्य केले .
                              घरी मी कधी एकटी किंवा मला एक एकटे वाटत  असताना खिडकीतून तिच्या डोलणाऱ्या फांद्या पाहून असे वाटायचे कि जणू त्या मला म्हणत आहेत कि आम्ही आहोत न गप्पा मारायला तुझ्या सोबत …!! खरेच या छोट्याश्या बागेत मी कितीही वेळ रमु  शकते आणि त्यांच्याशी गप्पा मारू शकते . घरातल्या प्रिय जागा पैकी हि एक जागा अत्यंत प्रिय मला .

माझी आई तर संध्याकाळचे ५ वाजले कि पायरीवर येउन बसते . शाळा सुटली कि येताजाता मुले  ,कळ्या तोडत जातात म्हणून कधी कधी तर यात मोठ्या बायका सुद्धा असतात!! गणपतीच्या दिवसात तर खूप लक्ष ठेवावे लागते नाहीतर आदल्या रात्री सगळ्या कळ्या गायब होतात . आमच्या घरी कळ्या तोडलेल्या कुणालाही नाही आवडत आई म्हणते दोन फुले कमी मिळाली तरी चालतील आपल्याला पण वेळे आधी फुल  तोडायचे नाही    झाडावर उमललेल्या कळीचा साज काही निराळाच असतो .

आम्हाला सकाळीही खूप लवकर उठून फुले काढावी लागतात नाहीतर सूर्योदयानंतर तिथे एकही आशेचा किरण नसतो . आता आमची जास्वंदी जवळ जवळ १८-१९ वर्षाची झाली आहे . तसा दुष्काळी  भाग असल्यामुळे पाणी कमीच… उन्हाळ्यात तर प्यायाच्या पाण्याचे हाल अशावेळी खूप दुरून पाणी आणून जगवली झाडे . आमची हि तळमळ  कदाचित जास्वंदीलाहि समजत असावी म्हणूनच तिने नेहमी भरभरून फुले दिली.
    आता परत थोडा बहर कमी आला असेल आईला विचारायला हवे ! मी आईशी फोन वर बोलत असताना माझ्या या सगळ्या झाडांचीही चौकशी करत असते ……. शेवटी लहानपणापासून जुळलेली नाळ आहे  ती

 कुंदा , गुलाब , आबोली , प्राजक्त आणि शेवंती सगळीच आहेत सोबतीला पण माझी हि जास्वंदी मात्र बारा महिने खुलते ,फुलते  स्वतः हसते आणि मलाही हसवते … !!! त्यामुळेच जेव्हा ब्लोग लिहियाचा ठरवले तेव्हा पहिले नाव डोळ्यसमोर जास्वंदीचेच आले …

आता गुलाबी ,पांढरी ,पिवळी जास्वंदीची झाडे आहेत पण माझ्या मनात घर करून राहिलेली माझी लाल जास्वंदी  !!!

2 comments:

  1. या आठवणी कधीच न विसरण्यासारख्या... यांना ब्लॉग रूपात साठवून ठेवण्यासाठी खुप खुप शुभेच्छा...

    ReplyDelete
  2. good...waiting for new blog!!!!!!!!!!!

    ReplyDelete