रोज रोज तेच करून कंटाळा आल्यानंतर वेगळे काम , कुठेतरी बाहेर फिरायला जाणे किती सकारात्मक उर्जा देणारे असते . गेल्यावर्षी मी आणि नवरा दोघेच बोस्टोनला कुणीच ओळखीचे नाही त्यामुळे जिथे जाईल तिथे दोघेच !!! पण आता इकडे न्यू जर्सीला आल्यापासून थोडे माणसात आल्यासारखे वाटते .
आता उन्हाळा सुरु झाला , इकडे या दोन्ही गोष्टीचा अतिरेकच आहे थंडी म्हणली तर खूप आणि उन्हाळाही तसाच , २-३ महिन्यातून कधीतरी एकदा मिळणारा long weekend सोबत मित्र मंडळी …. दंगा , मजा मस्ती याचा खूप दिवसांनी अनुभव घ्यायला मिळाला .
शुक्रवार संध्याकाळपासून आमची सुट्टी सुरु झाली , सगळे ऑफिसमधून येउन जमा होऊन निघायला ७ वाजले पण सूर्यास्तच आता खूप उशिरा होतो त्यामुळे तसेही खूप लवकर निघाल्यासारखे वाटत होते . साधारणपणे ७ वाजता आमची गाडी poconos moutain साठी रवाना झाली . यावेळी आम्ही सगळे मिळून १३ लोक्स , त्यात ३ बच्चे कंपनी …
एका मागे एक अशा तीन गाड्या … सगळ्या अगदी लयबद्ध ओवरटेकची मजा नाहीच . जर कुणी केला आगाऊ पणा तर असतातच पुढच्या एक्झिट ला पोलिस मामा भेटायला . दोन तासाची सफर झाली आणि एका सुंदर वळणावरून गाडी जंगलात … इतकी झाडे हिरवीगार ,मस्त थंडगार वारा , आम्ही ३ दिवस राहण्यासाठी एक Camel Ski Resort बुक केले होते अगदी घरासारखे . त्याच्या सगळ्या बाजूनी उंच उंच झाडे अगदी टिपिकल जंगलात राहायचे फिलिंग .
इथे ३-४ दिवस बाहेर राहायचा माझा पहिलाच अनुभव , आम्ही तिथे पोहचलो होतो तेव्हा १० वाजत आले होते आणी असे कुठे बाहेर असले कि जरा जास्तच भूक लागते नै का ? कुणी काय आणायचे आहे ते आधीच ठरले होते . पुलाव , भरून वांग्याची भाजी , उसळ ,चटणी , लोणचे , कितीतरी प्रकार सगळ्यांना कधी एकदा जेवतो असे झाले , सगळे सामान गाडीतून फक्त आत आणून ठेवले . आणि लगेच सगळे जेवण टेबल वर तयार कुणाला काय हवे ते घ्या !!! छोट्यांचा दंगा होताच पण मोठेही कमी नाहीत , इतक्या सगळ्यांमध्ये जेवताना वाटत होते कि किती दिवस झाले जेवून ? कितीही खाल्ले तरी पोट भरतच नव्हते मन मात्र तृप्त झाले होते .
जेवून झाल्यावर सगळ्याचेच डोळे झोपेला आले होते काम आणि प्रवासचा थकवा …
आम्ही बरेच लोक हॉल मध्ये एकत्र झोपलो हा प्रकार ना मला खूप आवडतो निवांत झोप लागेपर्यंत गप्पा उगीच हसणे , सकाळी निवांत उठणे ,लग्न घराची आठवण करून देणारा …
सकाळी ६ वाजले असतील तरी ८ वाजून गेले असतील इतका उजेड बाहेर … तरी ८ पर्यंत लोळणे चालूच होते हा जगातील सगळ्यांच्याच आवडीचा छंद पण आयांश आणि अनया हे दोघे झोपून देतील तर कसले ? यांना सगळ्यांना झोपेतून उठवायचे contract दिल्यासारखे चालू होते . आमच्या जगी सर्वसुखी असा कोण आहे ? या विचारांवर पाणी पडण्याचे काम ते बरोबर करत होते !!
सकळी चहा आणि पोहे झाल्याशिवाय आपली सकाळच झाली आहे असे वाटतच नाही . मस्त गरम गरम पोहे आणि चहा आणि त्यासोबत फ्री गप्पा दिवसभर आज करायचे याच्या !
adventure rides ला सगळ्याचे अनुमोदन मिळाले . तिथे खूप काही करण्यासारखे होते पण वेटिंग खूप … camelback moutain coaster ride केली त्यामध्ये पूर्ण त्याचा सगळा कंट्रोल तुमच्याकडे आणि फिरत आजू बाजूला डोंगर दर्यातून फिरायचे सुंदर मनमोहक त्या पर्वताचा नजारा … यावेळी खूप काही डोळ्यात साठवले फोटोपेक्षा !!!! ४००० फिट zip flyer पाऊस पडल्याने कॅन्सेल करावी लागली .
दुसऱ्या एका राईड मध्ये खूप उड्या मारल्या . थोडावेळ badminton खेळण्यात घालवला
शेवटी Go Karting बापरे !! सही होती हि कार गोल गोल घुमो … आवडली म्हणून तीनवेळा केलेली राईड !!! यात सगळ्यात जास्त वेळ तुमचा नंबर लावण्यातच जातो … पण काही दुसरा पर्यायही नाही … इथे paintball ला खूप मजा आली .
पहिला दिवस संपवून ९च्या आसपास घर वापसी .
परत घरी येउन जेवण गरम करणे खाणे आणि गप्पांचा फड रात्री २ पर्यत … आपल्या घरातल्या लोकांसोबत नेहमीच बाहेर जात असतो , पण ज्यांना आपण ओळखतो त्यांच्यासोबत आणखी सुंदर धागे दोरे गुंफण्यासाठी या सहली , एकमेकासोबत वेळ घालवणे अशाने सहज साध्य होतात . यात आपल्याही काही कमी कळतात नवीन लोकांना समजून घेण्याची संधी मिळते . जे अबोल असतात त्यानाही वाटते आपण बोलावे …
दुसरा दिवस हा सगळ्यांसाठीच खास होता … पाणी पाणी आणि पाणी
घरातून निघताना सगळ्या पुरुष कंपनीने मिळून लिंबू सरबत केले होते तिथे उनामध्ये फिरताना त्रास होऊ नये किती काळजी आमची !!!!!
water rides खूप धमाल … मला लहानपणपासून घसरगुंडीची खूप भीती आहे आणी या पाण्यात खेळायचे म्हणजे सगळ्यावरून घसरत खाली !!! पण ज्यात tube मध्ये बसून खाली यायचे होते त्या म्हणजे सोन्याहून पिवळे !! पाण्यात खेळायला कुणाला आवडत नाही ? lazy river मध्ये tube मध्ये आरामात बसून गोल गोल फिरणे इतके आळशी कि मागून कुणीतरी येउन धक्का देतेच तुम्ही आपोआप पुढे ….
मला त्याचे नाव नाहीय आठवत पण आम्ही त्यात बसून पर्वतच्या टोकावर गेलो होतो जाताना आणि परत खाली येताना काय सुंदर नजारा आणि हरीण बागडताना इतके दिसत होते कि बस्स !!! तिथून परत यायलाच नको वाटत होते .
इतकी लोक पण स्वच्छता आणी टापटीपपणा …
तुमच्या जीवाची तुम्हला जितकी काळजी नाही तितके इथले security वाले करतात !!!!
बाहेर थोडे थोडे पावसाचे वातावरण … तुम्ही जंगलात आणि भेळ काय सही आहे ना ?
घरी परत येउन पत्त्याचा डाव रंगला ७-८ ,,५-३-२ ,, challenge बापरे इथे इतकी फसवा फसवी हसून हसून पोट दुखायला लागले . हा मजा मस्तीचा वेळ खूप लवकर जातो !!!
तितक्यात जोरात पाऊस सुरु झाला आणि आमच्या सुंदर घरामध्येच टीप टीप बरसा पाणी चालू झाले आणि त्या पावसाने आमच्या तिथल्या शेवटच्या मुक्कामी लग्न घराच्या मनसुब्यावर पाणी फिरवले .
शेवटचा दिवस सगळेच कंटाळलेले उद्या ऑफिस या विवंचनेत …
तरीही पहिल्या दिवशी पावसामुळे कॅन्सेल झालेली आमची ride ४०००फिट zip flyer आज पूर्ण करायचीच होती . नशीब आज जोरावर होते त्यामुळे लवकरचे तिकीट मिळाले , तिथे खाली रेडी होऊन गाडीत बसून पर्वतच्या टोकावर गेलो , तिथे फोटो सेशन करून fb ला टाकून आमची सेना खाली येण्यासाठी तयार … दोन दोन च्या जोडीने !! हा अनुभव पण डोळ्यात मनात साठवून ठेवावा असाच ….
यानंतर १००० zip line हि राईड फक्त अन फक्त त्या सुंदर जंगलात फिरण्यासाठी आणि फोटोसाठी केली …
यावेळेचा अनुभव खरेच खूप सुंदर होता ३ दिवस घरापासून दूर पण तरीही जवळ सगळेच आपले आणि सगळेच वेगळे ,
प्रत्येकजण आधीपासून ओळखीचा असूनदेखील अनोळखीच वाटत होता खूप नवीन रूपे पहायला मिळाली , रोजच्या आयुष्यापेक्षा माणूस निसर्गात अधिक खुलतो .
अशावेळी माणसातला माणूस कळतो का ते माहित नाही … पण निसर्गातल्या माणसाला तो स्वतः नक्कीच कळतो .
सगळी आवरा आवर करून आम्ही तिथून निघालो , आणि एक मस्त इंडिअन हॉटेल मध्ये जेवायला पोहचलो . तिथे जास्त कुणाला काही बोलायचा मूड नव्हताच . सगळ्यांना एक वेगळेच समाधान होते जे कि पुढच्या काही दिवसासाठी tonic होते .
जेवणानंतर प्रत्येकाच्या वाटा वेगवेगळ्या होत्या पण तरीही त्या एकमेकात अडकल्या होत्या .

No comments:
Post a Comment