चार दिवस झाले आता कुठे सकाळी लवकर उठायची सवय लावून घेत आहे .. म्हणून आपला मित्र मैत्रिणी , जरा फेसबुक , व्हाट्सअप ला जास्त येऊ लागले ..
नेहमीप्रमाणे जरा सकाळी फिरून आले ??? आणि येऊन मोबाईल बघत बसले कुणाचे शुभ प्रभात तर कुणी शुभ संध्या .. नाहीतर तेच आपले सगळीकडे फिरून आलेले आणि दमून भागून येऊन पडलेले मेसेज ...
मित्र मैत्रिणींना रिप्लाय देत होते तोच एक मेसेज चमकला ...
काय आज खूप दिवसांनी रिप्लाय दिला ??
मी : हो
मेसेज मित्र ( मेमि ) : काय चालू , कशी आहेस ?
मी : हा मजेत , बसले आहे निवांत ( निवांत या शब्दालाच माशी शिंकली ना ) !!!
मेमि : तुला घरी बसून कंटाळा येत नाही का ग ? म्हणजे बोअर होत नाही ...??/
मी : हा कधी कधी ( का बोलले मी असे ) .. पण जातो माझा चांगला वेळ वाचन करण्यात काहीतरी बघण्यात ... आणि माझ्या प्रिय सखी " निद्रा " सोबत ( झाली इथेच नजर लागली मला )
मेमि : तसे नाही ग , पण तुला वाटत नाही का कि काहीतरी फळ देणारे आपण करावे ( fruiful तो असे म्हणाला होता ) आणि तू खुप छान लिहिते ग ( हरभरा झाड आठवले मला )
मी ( मनातल्या मनात) अजून एक बिझनेस बोलावणे आले .... !!! हे देवा वाचवरे मला !!!!
मी : अरे जे काही आहे ते थेट सांग उगीच आडून बोलू नको ..
मेमि :तसे नाही ग पण तुला इंटरेस्ट असेल तर बोलू ..
मी : हे बघ जे काही चेन टाईप बिझनेस आहेत त्यात मला इंटरेस्ट नाहीय ... सो मला काही सांगू नको ..
मेमि : मी काही तुला फसवणार नाहीय .. यात खूप फायदा आहे .. तुला फिरायची आवड आहे तू ती पूर्ण करू शकते !!! ...
मी माझ्याच मनाला झालं सुरु आता बोलण्यात काही राम नाही ..
मेमि : (अजून त्याचे चालूच आहे ) अग आमचा असला काही बिझनेस नाहीय , यात खूप फायदा आहे आमचे हे सर बघ आता त्याच्या फॅमिली बरोबर अमेरिका टूर ला गेले आहेत , त्यांचे फोटो येत आहेत !! !!
तू तुझ्या आई वडिलांना आता घेऊन जाऊ शकत नाही या बिझनेस मुळे तू त्यांना तिकडे घेऊन जाऊ शकते !!
(मी परत माझ्या मनाला माझ्या आई बापाच्या मागे आता साक्षात ब्रह्मदेव जरी लागला कि तुम्ही अमेरिकेला जा तरी तर काही यायचे नाहीत !!!! )
मेमि : बघ मी तुला काही जबरदस्ती नाही करणार ....
(परत मी माझ्या मनालाच किती वेळा बोलले मी माझ्या मनासोबत ते पण थकले आता .. मी किती उशीर झाले त्याला काही रिप्लाय देत नाहीय एकदा नाही म्हणून सांगितले आहे आणि तो मेसेज करतच आहे याला काय म्हणतात जबरदस्तीच ना ??)
मेमि : बघ एकदा तुझ्या नवऱ्याला सांगून , आपण व्हिडिओ कॉल करू .. !!!!
मी मनातच ओरडत आहे नको !!!!!!!!!!!
मी शेवटी थेट त्यालाच .... हेबघ मला नाहीय इंटरेस्ट मला नाही करायचे आता यातले काही ...
पण मी आता एक करणार आहे जे काही बोलणे आपल्यात होत आहे ते मी पोस्ट करणार आहे ... !!!!
मेमि : त्यात माझे नाव घेऊ नकोस हा !! सगळे पॉसिटीव्ह लिही ...
(हे देवा आता मी काय लिहायचे तेपण हा सांगणार का ? हे मात्र देवाला !!!!)
जाऊदे ना मुझको क्या ... अजूनही येत आहेत मेसेज तोवर झाले माझे लिहून !!!! आनेदो रे !!!!
आता उद्यापासून नकोच ते लवकर उठणे !!! कटकट डोक्याला !!! हे आता नवऱ्याला सांगितले कॉल करून कि उद्यापासून पहिले पाढे पंचावन्न !!!! बसला आहे ऑफिस मध्ये बिचारा डोक्याला हात लावून कधी नव्हे ते बायको लवकर उठत होती !!!!