" मुग्धा , तू आज यायलाच हवे पार्टीला नाहीतरी आपली हि एकत्र अशी शेवटची पार्टी आहे " तिच्या हॉस्टेलच्या मैत्रिणी मुग्धाला समजावत होत्या ..
कॉलेजचे हे त्यांचे शेवटचे वर्ष होते आणि दोन महिन्यांनी परीक्षा झाली कि सगळे आपापल्या घरी असणार होते, मुग्धाला पार्टीमध्ये जायला काही अडचण नव्हती पण पूर्ण रात्र बाहेर थांबावे लागणार होते .. यावेळी सगळ्यांनी मिळून नाईट आऊट पार्टी ठरवली होती आणि पार्टी फक्त मुलींची होती त्यामुळे तिला जावे असे वाटत होते पण फक्त घरी कळाले तर खूप ऐकून घ्यावे लागणार होते त्यामुळे तिची व्दिधा मनस्थिती झाली होती . तसे तिच्या घरचे तिला नक्कीच नाही म्हणाले नसते पण पूर्ण रात्र बाहेर राहणे ,, हे पटण्यासारखे नव्हते फक्त मुलींची पार्टी असली तरीही ...
आधीच त्यांचे नातेवाईक तिच्या आई बाबांना बोल लावत असत कि शहरात राहून तुमची मुलगी बिघडली .. परंतु
सगळ्या मैत्रिणीचा आग्रह तिलाही मोडवेना आणि शेवटी ती पार्टीसाठी तयार झाली ...
तसेही हॉस्टेलवरून त्यांचा ७-८ जणींचा ग्रुप होता ,, एका मैत्रिणीच्या फ्लॅटवरच पार्टी होणार होती , आणि हॉस्टेलच्या दोघी ,तिघींकडे गाडी असल्यामुळे येण्याजाण्याचा काही प्रश्नच नव्हता , सगळ्याजणी तयार होऊन ७ वाजताच हॉस्टेलमधून बाहेर पडल्या .. आणि मैत्रिणीच्या म्हणजेच अर्पिताच्या फ्लॅटवर जमल्या .
गाणी , डान्स , खाणे पिणे , सगळे अगदी मस्त मजेत चालू होते . मुग्धा , अर्पिता आणि बाकी दोघी तिघी गप्पा मारत बसल्या होत्या , तितक्यात अर्पिताचा मोबाईल वाजला नंबर पाहून अर्पिता बाजूला जाऊन बोलू लागली, त्यावरून सगळ्यानांच अंदाज आला कि हा नक्कीच अर्पिताच्या बॉयफ्रेंडचा कॉल आहे ..
मुग्धाचे सगळे लक्ष अर्पितावरच होते आणि तिच्या चेहऱ्याकडे बघून असे वाटत होते कि ती कोणत्यातरी अडचणीत सापडली आहे ..थोडावेळ अर्पिता फोनवर बोलून सगळ्यांच्यात येऊन बसली पण तिचे तिथे लक्ष लागेना कुठल्या तरी विचारात ती गुंगली होती ..
" अग अर्पिता, काय झाले ते तरी सांग , कोणत्या विचारात इतकी गुंग आहे ?" मुग्धा तिला विचारत होती ..
तरीही अर्पिता काहीच बोलेना .. मुग्धा उठून तिच्या जवळ जाऊन बसली ,, आणि तिला विचारू लागली " अप्पू , आपण तर एकमेकींपासून काहीच लपवत नाही , मग काय झाले ते सांग ना .. काही अडचण आहे का ?"
आजूबाजूला कुणी नाही हे पाहून अर्पिता बोलू लागली , " मुग्धा आज हि आपली पार्टी फक्त मुलींची आहे म्हणून मी अनिकेतला सांगितले होते .....
हो अर्पिता माहित आहे मला आणि म्हणूनच तर मी पार्टीला आले ना !!! मुग्धा तिला मध्येच तोडत म्हणाली ..
अरे हो ग पण पूर्ण ऐकून तरी घे ना माझे म्हणणे ... असे म्हणून अर्पिता बोलू लागली , अनिकेत मला म्हणत होता कि , तू मला पार्टीला नाही बोलावले मग बाकीच्या मुलांना कुणी बोलावले ते का येत आहेत ? मी तुला म्हणत होतो कि आपण पार्टी आपण एकत्र करू पण तू ऐकले नाही माझे ......
हे ऐकून मला काहीच समजेना म्हणून त्याला मी विचारले अरे असे कसे होईल जर मी तुलाच नाही बोलावले तर बाकीच्या मित्रांना कसे बोलवेन ? पण तो काही ऐकूनच घेईना ग !!! तो म्हणाला तुमच्या बाकीच्या मैत्रिणीनी बोलावले असेल त्यांना .. आणि बघ ते येत आहेत पण त्यांचा विचार मला काही चांगला दिसत नाही "
असे म्हणून अनिकेतने फोन ठेवला .... परत अर्पिता त्याला फोन लावत होती पण त्याचा फोन बंद होता ...
हे ऐकून मुग्धाही विचारात पडली .. तिलाही समजेना काय करावे ते ?
दोघीनी ठरवले कि सगळ्यांना विचारून बघायचे कि कुणी या मुलांना पार्टीमध्ये बोलावले ? त्याप्रमाणे त्या एक एकीला जाऊन विचारू लागल्या पण सगळ्याच नाही नाही म्हणत होत्या ....
मुग्धा अर्पिताजवळ आली तिच्या कानात तिने काहीतरी सांगितले आणि ती पटकन तिथून निघून गेली , मुग्धा जाऊन फक्त १० -१५ मिनिटेच झाली तेवढ्यात दारावरची बेल वाजली अर्पिताला वाटले आली असेल मुग्धा तर ... पुढे त्यांच्याच कॉलेजमधील चार पाच मित्र होते ,, अर्पितां आणि बाकीच्या दोघीजणी येऊन दारातच त्यांना थांबवले आणि विचारू लागल्या तुम्ही इथे काय करत आहात ?
तर त्यातील एक जण म्हणाला , हे बरे आहे अर्पिता एक तर स्वतः मेसेज करते पार्टीला या आणि आता आलो तर दारातच आमची उलट तपासणी ??
काही काय मी कधी केला तुम्हाला मेसेज ? अर्पिता विचारत होती ...
त्यातील एकाने त्याचा मोबाइल दाखवला आणि त्यावरचा मेसेजपण .... be ready for party at ८:३० ...
आता उडायची वेळ अर्पिताची होती ... तिला काहीच माहिती नव्हते .. सगळ्याजणी अर्पितालाच बोलू लागल्या तू आम्हाला विचारत होती आता हे काय म्हणून ? अर्पिताला तर काहीच सुधरत नव्हते आणि मुग्धाही नाही ....
सगळेच आत आले अर्पिता डोक्याला हात लावून विचार करत होती मी कधी पाठवला असेल हा मेसेज ??
पण तिला फक्त प्रश्नच दिसत होते त्याची उत्तरे नाहीच ...
अर्पिताने मुग्धला मेसेज केला ,, कुठे आहे ? लवकर ये !! पण मुग्धाचा काहीच रिप्लाय नाही .. तिने तिला फोन केला तर पलीकडून फोन कट केला त्यावरून अर्पिताला मुग्धाची आणखीच काळजी वाटू लागली..
मुग्धा गाडीवरून जात होती तर तिच्यापासून पाठीमागे काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणून तिने गाडी थांबवून पहिले तर कुणाचा तरी ऍक्सीडेन्ट झाला होता तिने उतरून जवळ जाऊन पहिले तर ती गाडी अनिकेतची होती !!! त्याला बराच मार लागला होता अनिकेत त्याचा पाय धरून जोरजोरात ओरडत होता ...
मुग्धाने पटदिशी तिथल्या लोकांच्या मदतीने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले ... आणि अर्पिताला फोन केला आणि सगळे सांगितले ..
थोड्याचवेळात अर्पिता आणि बाकीचे सगळेच तिथे आले ,, अर्पिता रडत रडतच मुग्धाच्या गळ्यात पडली .. सगळे बाहेर थांबले होते ..
त्याच हॉस्पिटलमध्ये दुसरी केस होती म्हणून इन्सपेक्टर अवि आले होते .. या सगळ्याची गर्दी पाहून त्यांनी डॉक्टरांना विचारले काय झाले कसली गडबड आहे .. डॉक्टरांनी त्यांना सगळी परिस्थिती सांगतली ..
असे होय म्हणत ते कसल्यातरी विचारात बाहेर गेले आणि रडणाऱ्या अर्पिताला पाहून जवळ बोलावले ,आणि तिला विचारू लागले खरा खरा हा प्रकार काय आहे ते सांगा ... अर्पिता खूप घाबरली होती आणि परत पोलीस पाहून तर जास्तच रडू लागली ...
मुग्धाने अर्पिताला शांत केले आणि सगळा प्रकार सांगितला ..
हे सर्व ऐकून ते अर्पिता आणि मुग्धाला घेऊन ज्या रूममध्ये अनिकेत होता तिथे गेले .. अनिकेतचे सगळे मित्र तिथेच होते ,, अचानक मुग्धा आणि अर्पिता पोलिसांसोबत पाहून सगळ्याचे चेहरे पांढरे पडले ... सगळेच तिथून निघून जात होते पण दाराजवळ आणखी दोघे उभे होते त्यामुळे ते गपचूप आत येऊन उभे राहिले ..
अनिकेत तर तिथून उठूच शकत नव्हता .. त्यामुळे अवीनी त्याला काही विचारायच्या आधीच तो बोलू लागला....
सॉरी अर्पिता !!! मला हे असे करायचे नव्हते पण मला तुझा खूप राग आला म्हणून मग मी ......
अर्पिता त्याच्याकडे पाहतच होती तो हे सगळे काय बोलत आहे ?
" अनिकेत नीट सांग मला काहीच समजत नाहीय तुला काय म्हणायचे आहे ते ?" अर्पिता त्याला म्हणत होती ..
अर्पिता तुझ्या मोबाइलवरून मीच सगळयांना मेसेज केले होते ... पार्टीला या म्हणून ,, आणि सगळयांना सांगितले होते कि तिथे जाऊन दंगा घालून मगच परतायचे .. ..आणि हे सगळे माझ्यावर येऊ नये म्हणून मी तुला फोन केला सांगायला ,, त्यानंतर अचानक मी मुग्धाला बाहेर पडताना पहिले मला सगळ्यात जास्त राग मुग्धाचाच आला होता , कारण तिच्यामुळेच तू मला पार्टीसाठी नाही म्हणाली होतीस ... म्हणून मी मुग्धाच्या मागे मागे जाऊ लागलो .....
"मुग्धा तू तर मला सांगूनच गेली होतीस ना कि मी १० मिनिटात जाऊन येते .. पण कुठे ते काहीच नाही सांगितले !!!" अर्पिता तिला विचारत होती ..
अग आपली गडबड चालुच होती आणि तितक्यात मला या अविकाकांचा फोन आला कि ते इकडे आले आहेत आणि आपलाही प्रॉब्लेम सुटेल म्हणून मी त्यांच्याकडे येत होते तर .. मी येत असताना मला असे जाणवले कि माझा पाठलाग कुणीतरी करत आहे !!! मी पुढे जाऊन थांबणार होते तर मागे याची गाडी खड्डयात कोसळली मग इथे त्याला घेऊन आले...
आणि अविकाकांना सगळे सांगितले ,, त्यांना असे वाटले कि यात काहीतरी गडबड आहे म्हणून त्यांनी मला सांगितले होते कि मी त्यांना ओळखते असे नाही दाखवायचे ...
आणि पुढचे सगळे तर तुला माहित आहेच .... इतक्या कमी वेळात इतके सगळे घडले अर्पिता कोसळतच होती तितक्यात मुग्धाने तिला सावरले .. आणि बाहेर घेऊन गेली
इकडे अनिकेत अवीची माफी मागत होता ,, असे कधीच परत करणार नाही म्हणून .... पण अविने त्याला सांगितले कि अर्पिताचे जे काही म्हणणे असेल त्यावर ठरेल तुझे काय करायचे ते .... !!!!
मुग्धा आणि अर्पिता बाहेर येऊन शांत बसल्या होत्या काहीच न बोलत योगायोगाने एक अपघात घडता घडता टळला होता !!!

No comments:
Post a Comment