" तुला आधीच सांगून ठेवतोय यावेळी पोरग झालं तर तू घरी येशील नाहीतर कायमच तोंड काळ करशील समजल का ? " सविताचा नवरा तिला सांगत होता .
लग्न झाले तेव्हा सगळे गोड गोड असणारे वातावरण आंनदीच्या जन्मानंतर बदलेले होते . आनंदी सविताची पहिली मुलगी ....
लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली आणि आणि तिला आपल्या आई होण्याची चाहूल लागली , सविताने नवऱ्याला सांगताच तो तर आनंदाने वेडा होऊन गेला सासूपण अगदी आनंदाने कौतूकाने तिचे डोहाळे पुरवीत होती ..
आपले होणारे कौतुक पाहून सविताला तर स्वर्ग दोन बोटे उरला होता .
भराभर दिवस जात होते , तशी सविताच्या माहेरची परिस्थिती बेताचीच पण लेकीचे पहिले बाळंतपण माहेरीच झाले पाहिजे म्हणून सविताची आई सातवा महिना लागल्यावर तिला घेऊन आली होती , सविताचे दिवस आनंदात जात होते म्हणता म्हणता नऊ महिने पूर्ण झाले आणि सविताने एक गोंडस मुलीला जन्म दिला .. मुलगी अगदी तिच्यावरच गेली होती ...
सविताच्या आईने तिच्या सासरी निरोप पाठवला एक दिवस गेला , दुसराही गेला पण कुणीच येईना तिला भेटायला .. बाळाच्या जन्मासाठी आतुर झालेली माणसे कुणीच का येत नाही भेटायला ? सविताला कळत नव्हते कि बाळाच्या जन्माचा आनंद मानू का दुःख ? हि जन्माला आली आणि माझी माणसे माझ्यापासून दूर गेली ..
त्यावेळेपासूनच तिला तिची मुलगी नजरेसमोर नकोशी झाली ..
यात त्या जन्माला आलेल्या लहानशा जिवाचा काय दोष होता ? हे तिला कळत होते पण ...
एक दीड महिना माहेरी राहून छोट्या आनंदीला घेऊन सविता सासरी परत गेली पण ती आली काय किंवा गेली काय ? कुणालाच त्याचे काही नव्हते ...
सविताला कळून चुकले कि आपल्याला पहिली मुलगी झाली म्हणूनच हे असे होत आहे ....
सारखे सासूचे तिरकस बोलणे , नवऱ्याचे तिच्याशी नीट न वागणे याचा राग सर्वतोपरी त्या छोट्या आनंदीवर निघू लागला तिलाही कळायचे नाही कि आपले काय चुकायचे !!!!
परंतु वेळ सारखीच नसते आणि परत एकदा सविताला आपल्या आई होण्याची चाहूल लागली ... पण यावेळी तिच्या सासूने आई नवऱ्याने तिला सांगितलेच होते मुलगा झाला तर घरी यायचे..
आनंदी तशी लहानच होती , आपल्यासोबत काय होते ? आजी, बाबा आपल्यासोबत नीट का नाही बोलत ? सारखे का रागवतात ? हे तिला कळत नसे ... आणि सविताही कधी कधी तिच्यावर राग काढत असे त्यामुळे आनंदी शांतच होत होती . तिला आता फक्त इतकेच माहिती होते आपल्या आईला एक छोटे बाळ होणार आहे त्यामुळे तिला त्रास द्यायचा नाही . मुळातच शांत असणारी आनंदी यामुळे आणखी शांत होत गेली .
नवऱ्याने आधीच सांगितल्यामुळे तिच्या डोक्यावर नेहमीच टांगती तलवार होती , कितीतरी देवांना नवस बोलून तिने पाण्यात ठेवले होते आणि अखेर ते तिच्या कामाला आले आणि सविताला मुलगा झाला ...
यावेळी तिच्या नवऱ्याने, सासूने मोठ्या थाटामाटात बाळाचे बारसे केले , सविताचे थोडेसे कौतुक होऊ लागले यात सवितालाहि आनंद होत होता पण या सगळ्यात आनंदी कुठेतरी मागे पडत होती , तिच्या बालमनावर आतापासूनच एक मुलगी असण्याचे ओरखडे उमटत होते ..
अभि आनंदीचा लहान भाऊ सगळ्याचा खूप लाडका ,, आनंदीचासुद्धा ,...
अभि आणि आनंदी मोठे होत होते .. सगळे अभिचे लाड करत त्याला काय हवे ते नको बघत पण अभिला मात्र त्याची ताई खूप प्रिय होती त्याचे सगळ्यात जास्त प्रेम आपल्या ताईवर होते .. त्यालाही समजत होते आई सोडले तर जास्त कुणी ताईशी बोलत नाही , तिचे लाड कुणी करत नाही .
त्याने एकदा ताईला विचारले होते ताई हे सगळे असे का वागतात , त्यावेळी नेमकी तिथे आजी आली आणि तो विषय तिथेच थांबला .
आनंदी शाळेत खूप हुशार होती , अभिला अवघड वाटणारे विषयही ती अगदी सोपे करून सांगायची त्यामुळे अभिला आपल्या ताईचा आणखीच अभिमान होता ..
सविताला असे आपल्या दोन्ही मुलांना एकत्र पहिले कि समाधान वाटत असे जे ती तिच्या मुलीसोबत मोकळेपणाने बोलू शकत नाही याचे तिचे दुःख थोडेतरी कमी होई ..
अभिला आता कळू लागले होते कि एक मुलगी आहे म्हणून आपल्या ताईला इतकी बंधने आहेत , ती मुलगी आहे म्हणून आजीला , बाबांना ती आवडत नाही .. त्यानंतर तर तो आपल्या ताईची जास्त काळजी घेऊ लागला...
आनंदीचे यावेळी बारावीचे वर्ष होते , त्यानंतर तिला शिक्षणासाठी बाहेर जावे लागणार होते ... प्रश्न होता तो तिच्या घरच्यांचा ते तिला शिकण्यासाठी पुढे पाठवतील का ? तिच्या आजीने तर आतापासूनच तिच्यासाठी स्थळे पाहायला सुरुवात केली होती .. या सगळ्याची कुणकुण अभिला लागली तसाच तो आजीकडे गेला आणि तिला सांगितले कि जर ताईला तुम्ही पुढे नाही शिकवले तर मीहि उद्यापासून शाळा सोडेन घरीच राहीन ...
आजीने त्याला समजवायचा प्रयत्न केला पण अभि काही ऐकून घेईना शेवटी त्याच्या ताईने समजावले तरी तो ऐकेना म्हणल्यावर आजीचा नाईलाज झाला , पुढच्या शिक्षणासाठी आंनदीला बाहेर पाठवले .
आनंदी मुळातच हुशार आणि लाघवी त्यामुळे कॉलेजच्या वातावरणात लगेच मिसळून गेली . आनंदी नव नवीन यशाची शिखरे गाठत होती .. त्यातूनच तिला जॉबचा कॉल आला ...
तिने हि बातमी सगळ्यात आधी अभिला फोन करून सांगितली , तसा अभि खुश होऊन तिला भेटण्यासाठी म्हणून येऊ लागला आणि येताना त्याच्या बाइकचा अपघात झाला ..
त्याला तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी दवाखान्यात ऍडमिट केले , आणि घरी फोन करून सांगितले तसे सविताला काही सुचेना ... सगळा दोष परत आनंदीच्या माथ्यावर आला होता सविता , तिचा नवरा , आणि सासू दवाखान्यात पोहचले पण त्याच्या आधीच आनंदी तिथे होती ...
इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपले कसे होणार याच्या विचारानेच सविता आणि तिचा नवरा कावरा बावरा झाला होता पण आनंदी सगळे अगदी मोठ्या हिमतीने करत होती , अभिला लागणारे रक्त यासाठी तिने तिच्या मित्र मैत्रीणीना बॊलवून घेतले होते , औषधे , सगळ्या टेस्ट यासाठी तिला सगळेच खूप मदत करत होते.
हे सगळे पाहून तिच्या आजीला आणि बापाला काय बोलावे हे कळत नव्हते , सविताला मात्र आपल्या मुलीचा खूप अभिमान वाटत होता . सगळे मार्गी लागल्यावर आनंदी आजीजवळ आली आणि म्हणाली , " आजी काही झाले तरी माझ्यामुळे मी अभिला काही होऊ देणार नाही , आजवर त्याने माझ्यासाठी खूप केले पण आता माझी वेळ आहे ." इतके सगळे आजीशी बोलण्याची आनंदीची पहिलीच वेळ होती ...
अभिला बरे होण्यासाठी दोन महिने लागले पण त्यासाठी आंनदीने तिचा जीव ओतला ... अभि बरा झाला त्यावेळी त्याने पहिला प्रश्न हाच विचारला , " ताई ?"
त्यावेळी हसरी आनंदी तिच्या आजीसोबत त्याच्याजवळ आली ...
ते पाहून अभि चक्रावला इतके सगळे अचानक ?
आनंदीची वेगवेगळी रूपे तिच्या आजी आणि वडिलांना पाहायला मिळाली होती तीच कि जी एक मुलगीही करू शकते , आनंदीने त्यांना दिलेला आधार , अभिची काळजी ... आणि बरेच काही
अभिच्या आजरपणामुळे का होईना पण आनंदींच्या आयुष्यात आज खरेच आनंदी फुलली होती ..

No comments:
Post a Comment