आजही मुग्धा नेहमीप्रमाणे बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभी होती , सकाळची वेळ त्यामुळे बस साठी गर्दी , कामाला जाणारे , शाळेला जाणारी मुले यांची धावपळ हे सगळे बघताना मुग्धाचा वेळ खूप पटकन जात असे .शाळेला जाणाऱ्या मुलांच्या गप्पा तिच्या कानावर पडल्या कि आपणही शाळेत जात आहोत असाच भास तिला होत असे . पण चार पाच दिवसापासून एक माणूस रोज त्या बस स्टॉप वर दिसत असे , आणि मुग्धाकडे एकटक पाहत असे . मुग्धाची आणि त्याची नजरानजर झाली कि तो दुसरीकडे पाहत असे , असा खेळ गेल्या काही दिवसापासून चालू होता , का कुणास ठाऊक पण मुग्धाला त्याच्या डोळ्यात एक वेगळीच ओळख दिसत असे आधी कुठेतरी पहिल्यासारखा चेहरा तिला आठवत असे .
मुग्धा आधी शिक्षणासाठी म्हणून शहरात आली त्यावेळी ती तिची मैत्रीण दीप्तीसोबत तिच्याच फ्लॅट मध्ये रहात होती कधी कधी काही कामासाठी म्हणून दिप्तीचा भाऊ अनिकेत येत असे त्यावेळी एक दोन दिवस तो तिथे राही ,सुरुवातीचे थोडे दिवस मुग्धाला अवघडल्यासारखे होत असे पण नंतर तिची आणि अनिकेतची मैत्री झाली . त्या तिघांचे त्रिकुट खूप छान जमले होते .
अनिकेत खूप बोलका ,पटकन सगळ्यांना आपलेसे करून घेणारा दिसायला स्मार्ट नसला तरी नाकी डोळस ठीकठाक होता . मुळातच हुशार असल्याने त्याच्या ज्ञानाचे वलय चेहऱ्यावर दिसत असे . त्याची यावर्षीची परीक्षा झाली कि तो पुढच्या शिक्षणासाठी परदेशी जाणार होता . त्याच्यासाठी त्याचा अभ्यास त्याचे करिअर खूप महत्त्वाचे होते यासगळ्यांपुढे बाकी सगळ्या गोष्टींची किंमत त्याच्या लेखी शून्य होती .
मुग्धा तिला तिचे शिक्षण स्वबळावर पूर्ण करायचे होते त्यासाठी तिचे पार्टटाइम नोकरी शोधणे चालू होते , दीप्ती नोकरी करत होती तिच्या येण्या जाण्याच्या वेळा काही नक्की नसत . तिच्या ओळखीवरूनच मुग्धा दोन तीन ठिकाणी जाऊन आली होती , थोडे दिवसात तुम्हाला कळवतो असेच तिला सगळीकडे सांगितले होते . दुपारी कॉलेज मधून आली कि ती फ्रीच असे . दिवस जात होते ....
मुग्धाला एके ठिकाणाहून नोकरीसाठी बोलावणे आले , तिथे गेली तर तिला उद्यापासून जॉईन व्हा असे सांगण्यात आले .
कधी एकदा घरी जाऊन सगळे दिप्तीला सांगते असे मुग्धाला झाले होते . आनंदाच्या भरात ती घरी पोहचली तर दार आतून बंद होते ...
अरे वा ! आज दीप्ती घरी लवकर आलेली दिसत आहे , माझ्या नोकरीचे ऐकून किती खूष होईल ती या विचारात तिचे बेल वाजवणे चालूच होते , दार उघडले तसे मुग्धा दीप्तीच्या गळ्यात पडत दीप्ती ! दीप्ती ! मला नोकरी मिळाली उद्यापासूनच या असे सांगितले ... ... ती बोलतच होती ....
इतक्यात अरे वा ! हो का अभिनंदन असे म्हणत अनिकेतचा आवाज ....
मुग्धाने वर पहिले तर ती तिच्या आनंदात दीप्ती समजून अनिकेतच्या गळयात पडली होती .
त्याला पाहून दोन मिनिटे तिला समजेना काय करावे ते ? ती तशीच उभी ...
अनिकेतने तिला हलवले तेव्हा कुठे भानावर आली पटकन तिने हात मागे घेतले ..
अनिकेतने अभिनंदन म्हणत हात पुढे केला तर कसाबसा त्याच्याशी हात मिळवत ती आता निघून गेली .
अनिकतेच्या डोळ्यात पाहणे तिला शक्य होत नव्हते .
अनिकेत मात्र नुसतंच हसत होता .
थोड्यावेळाने दीप्ती घरी आली , अनिकेतने तिला मुग्धाच्या नोकरीचे सांगितले , तितक्यात मुग्धा बाहेर आली दिप्तीने अभिनंदन करून आज आपण बाहेर जेवायला जाऊ असे सांगितले मुग्धाचाही तोच विचार होता .
सगळे मस्त तयार होऊन जेवणासाठी बाहेर पडले .जेवणानंतर आईस्क्रीम खाऊन घरी आले .
उद्या मुग्धाचा पहिला दिवस होता आणि दिप्तीला लवकर जायचे होते त्यामुळे त्या लवकर झोपल्या .
अनिकेत त्याचा अभ्यास करत बसला ..
सकाळी मुग्धाला बेस्ट लक करून दीप्ती लवकरच बाहेर पडली .
मुग्धा तयार होऊन बाहेर जात होती इतक्यात अनिकेतने तिच्या हातात प्राजक्ताची फुले ठेवली . शुभेच्छा म्हणून तो निघून गेला .
मुग्धा त्या फुलांकडे पाहत होती , त्यांचा सुगंध तिच्या सगळ्या शरीरात फुलला होता ... स्वतःशीच हसून ती ऑफिसला निघाली .
ऑफिसचा पहिलाच दिवस असल्यामुळे काम कमी होते , पण राहून राहून ती फुलेच तिच्या नजरेसमोर येत होती .
अनिकेत मितभाषी त्यामुळे तो स्वतःहून त्याच्या मनात काही असेल तर बोलणार नाही हे तिला माहित होते .
आणि झालेही तसेच दुसऱ्या दिवशी ती ऑफिसमधून यायच्या आधीच तो निघून गेला होता . तिला खूप राग आला होता पण सांगणार कोणाला ? दीप्तीशी ती यावर काही बोलू शकत नव्हती .
थोडे दिवस झाले पण अनिकेत आला नाही , आणि दिप्तीला काही दिवसासाठी दुसऱ्या शहरात जावे लागणार होते नक्की किती दिवसासाठी हे तिला माहीत नव्हते .
मुग्धाला काहीच कळत नव्हते इथेच राहावे कि दुसरीकडे जावे पण तिच्या ओळखी खूप कमी होत्या त्यामुळे दुसरीकडे लगेच सोय होणे शक्य नव्हते . दिप्तीला जरी ती तिथेच राहिली तरी काहीच हरकत नव्हती प्रश्न होता तो फक्त अनिकेतचा ... !!!
हो नाही करत मुग्धा तिथे राहायला तयार झाली , कारण तिला ऑफिस , कॉलेज सगळेच जवळ पडत होते आणि मुख्य म्हणजे हि जागा तिच्या सवयीची झाली होती . आणि इथे राहिली तर परत कधीतरी अनिकेत भेटेल हि आस मनामध्ये होतीच ...
आता मुग्धा एकटीच राहत होती दिप्तीला जाऊन २ महिने होत आले होते . अनिकेतची काही खबरबात नव्हती .
एक दिवस मुग्धा घरी आली तर दार आतून बंद , दीप्ती तर आली नसेल ? कि अनिकेत ? अनिकेतची नाव मनात येताच तिच्या मनाची धडधड वाढली . कंप पावणाऱ्या हाताने कशीतरी तिने बेल वाजवली तर पुढ्यात अनिकेतच उभा !!!!
त्याला पाहून मुग्धाला काय बोलावे ते समजेना ?
त्याला हाय करून ती आत निघून गेली , अनिकेत नेहमीप्रमाणेच वागत होता त्याच्या वागण्यात काहीच वेगळेपण नाही !! मग मलाच का असे होत आहे ? याच विचाराने मुग्धाला काही सुचेनासे झले ..
ती स्वयंपाकासाठी गेली तर अनिकेतने सगळे करून ठेवले होते फक्त पोळ्या करायच्या बाकी होत्या .
" अरे ! तू कशाला केले इतके सगळे मी केले असते ना ? " मुग्धा
" अग हो तू दमून येशील मग कधी करणार म्हणून म्हणले आज आपण करावे ." अनिकेत
मुग्धाला मात्र खूप छान वाटत होते आपण दमून भागून आल्यावर आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी असेच स्वयंपाक केला असेल ती तिच्या विचारात हरवली
मुग्धा ! मुग्धा ! जरी बाकी सगळे मला येत असले तरी पोळ्या मात्र तुला कराव्या लागतील मला त्या अजून जमत नाहीत कि करू नकाशे ? असे अनिकेत म्हणताच मुग्धा हसत हसत कामाला लागली .
जेवण झाल्यावर सगळे आटपून मुग्धा तिच्या रूममध्ये गेली आणि अनिकेत अभ्यास करत बसला होता .
अचानक वादळी पाऊस सुरु झाला , वीज , ढगांचा कडकडाट होऊ लागला . मुग्धा पुस्तक वाचत बसली होती .
आणि अचानक लाइट गेली , सगळीकडे अंधार मुग्धा बॅटरी घेऊन बाहेर आली तर अनिकेत तिच्याकडेच येत होता .
दोघेही एकमेकासमोर मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात बसले होते . मुग्धाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गुलाबी छटा होती , आता काय ? हा एकच प्रश्न दोघांच्या मनात होता .
विजांचा कडकडाट जसा वाढू लागला तशी मुग्धाची चलबिचलताही वाढू लागली .
काहीतरी बोलायचे म्हणून मुग्धा त्याला विचारू लागली , " अनिकेत त्या दिवशी तू मला प्राजक्ताची फुले का दिली ? "
तुला आवडतात म्हणून , इतकेच अनिकेत बोलला आणि गप्प बसला ..
पण तुला कसे कळाले कि मला प्राजक्त आवडतो ते ? तिने मिश्कीलपणे त्याला विचारले .
कसे म्हणजे काय रोज सकाळी बघतो ना तुला त्या प्राजक्ता जवळ रुंजी घालताना त्याची काळजी घेताना तू इथे राहायला आल्यापासून तसा तो खूपच बहरला आहे. हे ऐकताच मुग्धाची कळी खुलली ...
अनिकेत त्याच्या नकळत आज काही वेगळेच बोलत होता , मुग्धा त्याला आवडत होतीच पण त्याने कधीच तिला बोलून दाखवले नाही ...
रात्र उलटत होती , त्यांच्या गप्पाना वेगळाच रंग चढत होता मध्ये कॉफी झाली , समोरासमोर बसलेले ते दोघे आता शेजारी येऊन बसले होते , अनिकेतने मुग्धाचा हात प्रेमाने हातात घेतला , तशी मुग्धा शहारली , तिचा हात थंड पडला .
मुग्धा , मागच्या वेळी दीप्ती समजून अजाणतेपणाने मला मिठी घातली त्यावेळीच वाटत होते कि तुला खरे काय ते सांगून टाकावे , पण मी असा अबोल , आणि त्यावेळेची माझी परिस्थिती मी काहीच करत नव्हतो , तुलाही नुकतीच नोकरी लागली होती . पण तुझी ती मिठी मी तुझ्यापासून दूर असतानाहि मला तुझी आठवण करून देत होती ... मला आता परदेशी जावे लागेल कधी ते सांगता येणार नाही किती दिवसासाठी तेही माहित नाही माझे प्रोजेक्ट संपले कि मी येईन परत . मला तू खूप आवडतेस ग .... अनिकेत बोलतच होता ....
बाहेर कसलातरी आवज झाला आणि मुग्धाने अनिकेतला घट्ट पकडले , आणि त्या बेसावध क्षणी मुग्धा आणि अनिकेत एक झाले बाहेर पाऊस पडत होता आणि आतमध्ये या दोघांची मने चिंब भिजत होती .
सकाळी मुग्धाने चहा केला अनिकेतला उठवले हे करताना मुग्धाला आज खूप वेगळेच वाटत होते , काहीतरी वेगळे फीलिंग ...
सगळे आवरून ती ऑफिसला निघून गेली ,अचानक अनिकेतला एक कॉल आला आणि तो निघून गेला . मुग्धासाठी एक मेसेज ठेवून ," मला एका महत्वाच्या कामासाठी जावे लागणार आहे मला वेळ मिळाला कि तुला कॉल करतोच "
संध्यकाळी मुग्धा घरी आली हा मेसेज वाचून ती उभ्या उभ्या खाली कोसळली ..
पण तिला अनिकेतवर विश्वास होता तो नक्की तिला परत भेटेल .
सहा महिने झाले पण अनिकेतचा काहीच पत्ता नाही , तिने दिप्तीला कॉल केला तर तिचा नंबर लागत नाही , काय करावे ते तिला समजेना !!! अशातच तिला एका दुसऱ्या जॉबची ऑफर आली , मुग्धासाठी ती नोकरी खूप काही देणारी होती त्यामुळे हि संधी वाया न जाऊ देता त्याचा उपयोग करायचा असे तिने ठरवले . जे होईल ते होईल या विचाराने तिने घराची किल्ली आणि तिचा फोन नंबर शेजारच्या काकूंकडे देऊन ठेवला आणि सांगितले कि दीप्ती ,अनिकेत आले तर त्यांना इतके द्या , काकूंचा निरोप घेऊन ती निघाली .
आता जवळ जवळ वर्ष होत आले , मुग्धा अनिकेतला विसरली नव्हती , पण काळ हा सगळ्या गोष्टीवर औषध असतो असे म्हणतात तसे होत होते ...
आज मुग्धा जेव्हा बस स्टॉपवर उभी होती त्यावेळी तिला निरखून पाहणारी व्यक्ती म्हणजे तिला अनिकेतच वाटत होता पण खात्री होत नव्हती . ...
समोर बस येऊन थांबली आणि तिला कुणाचा तरी धक्का लागला तशी ती वास्तवात आली , आणि बस मध्ये चढली तर तो माणूस तिच्या मागोमाग त्याच बस मध्ये आला .
मुग्धा तिच्या ऑफिसच्या स्टॉपला उतरली तिच्या मागोमाग हाही उतरला ... आता मात्र मुग्धा जाम वैतागली होती , ती त्याच्या जवळ गेली आणि त्याला बोलू लागली ," रोज पाहत आहे मी काय मागे मागे असता माझ्या सारखे ? मी कधी चढते उतरते काय खाते पिते याकडे अगदी बारीक लक्ष असते तुमचे .... "
त्याने शांतपणे गॉगल काढला आणि मुग्धाकडे पाहत हसला तो काही बोलणार इतक्यात त्याच्या नजरेत तिला आपली ओळख पटली .
अ.... अनिकेत !! तू हो अनिकेतच ..... !!!!
आज इथे कसा तू ? माझा पत्ता कसा मिळाला ? आणि आज सवड मिळाली तुला मला भेटायला ? आज का आला आहेस परत सोडून जाण्यासाठीच ना ? नुसती स्वप्ने दाखवायची .... मुग्धा इतक्या दिवसाचा राग त्याच्यावर काढू पाहत होती आणि तो मात्र हसत होता ....
मुग्धा ऐकून घे ना माझे बोलू आपण निवांत ....
अनिकेतला नाही म्हणणे मुग्धासाठी अशक्यच होते ...
शेवटी एकाठिकाणी दोघे बसले अनिकेत बोलत होता , " मुग्धा , माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला आहे मला माहित आहे पण काय करू वेळच अशी होती कि मी काहीच करू शकलो नाही , त्यावेळी मला माझ्या प्रोजेक्ट हेड कडून बोलावणे आले होते माझा पार्टनर मी केलेल्या कामाचे सगळे क्रेडिट घेत परदेशी जात होता , तो घोळ मार्गी लावत होतो तोच , दिप्तीचा अपघात झाला ती दोन महिने कोमात होती , आता बरी आहे पण बोलताना , चालताना अजूनही तिला त्रास होतो ,
त्याच्या नंतर मला ५ महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर परदेशी जावे लागले मी नाही म्हणू शकत नव्हतो कारण पैशाची अडचण होती . तुला हे सगळे सांगावे म्हणून आलो होतो ते तू निघून गेली होतीस .... तुझा फोन नंबर मिळाला खूप लावून पहिला पण तो कधी लागलाच नाही , मागच्या आठवड्यात आलो मी इकडे परत , तिकडे असतानाहि तुझी माहिती मिळवण्यासाठी माझ्या मित्रांच्या मागे लागलो होतो , तुझ्याच प्रोजेक्टमध्ये माझा एक अभि नावाचा मित्र काम करतो त्याच्यामुळे तुला भेटू शकलो .... आता बोल तू ....
" अनिकेत , काय बोलू मी ? त्यादिवशी आपल्यात जे काही झाले आणि परत तू लगेच निघून गेला मला खरेच समजत नव्हते कि मी काय करावे ? "
" घरी तरी कोणत्या तोंडानी सांगणार होते ? घरचे मागे लागले आहेत लग्न कर लग्न कर पण कसे करू ? " त्यांना सांगितलेही असते तुझ्याबद्दल पण मलाच काही माहित नाही तर त्यांना काय सांगणार ? आणि नंतर तू मला असेच सोडून गेला तर ? काय करू मी ?
मुग्धा वेडी आहे का ? तुझ्या इतकेच मीहि वेडा होत होतो मलाही खूप इच्छा होती तुला भेटायची बोलायची पण ती वेळ आपली नव्हती ग ... कसे समजावू तुला .... ?? तू दीप्तीशी बोल मी तिला आपल्यातले सगळे सांगितले आहे मग तर विश्वास बसेल तुझा ?
दीप्तीचे नाव घेताच मुग्धा शांत झाली
अनिकेत तुझ्यावर विश्वास होता म्हणूनच तर इतके दिवस मी तुझी वाट पहिली ना ? आणि तू आता असे म्हणत आहे का ?
अग वेडाबाई मजा केली तुझी , बरे डोळे झाक तुझे आता ....
का रे ?
अग झाक तर खरे ....
तिने डोळे झाकल्यावर अनिकेतने तिच्या हातात प्राजक्ताची फुले ठेवली ...
हातात गारवा जाणवला म्हणून मुग्धाने डोळे उघडले तर समोर परत एकदा प्राजक्त फुलला होता .... आणि रिमझिम पावसाची सुरुवात होत होती ....